विशेष प्रतिनिधी
बीड : आम्ही 20 जानेवारीला मुंबईला निघणार आहोत. तीन कोटी मराठे मुंबईत जातील. आमची दिशा मुंबई असून ध्येय मुंबई आहे. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना श्रीरामाने सुबुद्धी द्यावी असे साकडे घालणार आहोत. आम्ही 22 जानेवारीला आनंद साजरा करू. नंतर अयोध्येला जाऊन आनंद साजरा करू. मराठे आता घरी राहणार नाहीत. मुंबईत जाऊन मराठा आरक्षण घेतील, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले.Three crore Marathas will strike in Mumbai; Maratha reservation leader Manoj Jarange announced at a program in Beed
बीड शहरात एका विवाहाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे सोमवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आले होते. त्यांनी विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी संपर्क साधला. या वेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमची दिशा मुंबई असून ध्येय मुंबई आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्यावे. बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरातून मराठे मुंबईला निघतील. आता मराठ्यांनी घर सोडले तर मराठ्यांची पोरे मोठी दिसतील. त्यामुळे मुंबईत आता तीन कोटी मराठे दिसतील, ते ताकदीने मुंबईला जातील, असे मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सांगितले. मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. मराठ्यांना स्वत:ची पोरं मोठी केल्याशिवाय मुंबईला जाणे हा पर्याय नाही. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी हे पहिले आणि शेवटचे मराठा समाजाचे आंदोलन आहे. आमच्या 54 लाख नोंदी राज्यात सापडल्या असून महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी एकच आहे, असेही ते म्हणाले.
छगन भुजबळांची बीडमध्ये महासभा
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली होती. त्या सभेमध्येच मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील बीडमध्येच महासभा होणार असून या सभेसाठी महात्मा फुले समता परिषदेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेमध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांची 13 जानेवारी 2023 रोजी सभा होत असून या सभेवर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘छगन भुजबळ यांना वेड लागले असून लोकशाहीने ते सभा घेऊ शकतात,’ असे जरांगे यांनी म्हटले आहे. भुजबळ यांची सभा होण्यापूर्वीच जरांगे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App