अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिराची उभारणी, पण बाबरीची आठवण काढून ओवैसींची तरुणांना चिथावणी!!


वृत्तसंस्था

हैदराबाद : अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिर उभे राहून 22 जानेवारी 2024 रोजी तिथे श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशात आणि जगभरात त्याचा उत्साह पसरत असताना ए आय एम आय एम पक्षाचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र एक भाषण करून बाबरी मशिदीची आठवण काढून तरुणांना चिथावणी दिली आहे. त्यांचे हे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.Supreme Court in Ayodhya, the construction of a grand Ram temple, but Owaisi provoked the youth by remembering Babri



खासदार असदुद्दीन ओवैसी या व्हिडीओमध्ये ते तरुणांना पाठिंबा आणि ताकद कायम ठेवण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. तरुणांनो आपण आपली मशीद गमावली आहे. तिथे काय केले जात आहे, ते आपण बघत आहोत. तुम्हाला याचा त्रास होत नाही का?? जिथे आपण 500 वर्षे बसून कुराण-ए-करीमचे पठण केले, आज ती जागा आमच्या हातामध्ये नाही, असे ओवैसी म्हणाले

तरुणांनो, आणखी 3 ते 4 मशिदींबाबत षड्यंत्र सुरु आहे. ज्यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश आहे. या शक्ती तुमच्या मनातून ऐक्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला पाहिजे आहे का? या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितले पाहिजे, अशा शब्दांमध्ये ओवैसींनी या तरुणांना चिथावणी दिली.

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले, तुमची ताकद आणि तुमची एकता कायम ठेवा. मशिदी लोकवस्तीत ठेवा. कारण या मशिदी आपल्याकडून काढून घेतल्या जातील. आजचे तरुण उद्या म्हातारे होणार आहेत. त्यामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला आणि शहराला कशी मदत करु शकतो, याचा विचार केला पाहिजे.

ज्या मशिदीत कुराण ए करीमचे पठण 500 वर्षे करीत असल्याचा दावा ओवैसींनी केला, प्रत्यक्षात त्या बाबरी मशिदीत कित्येक वर्ष नमाज पठण होतच नव्हते, ही बाब मात्र त्यांनी चलाखीने लपवून ठेवली.

Supreme Court in Ayodhya, the construction of a grand Ram temple, but Owaisi provoked the youth by remembering Babri

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात