एजन्सीच्या रडारवर ४३ संशयित
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील भारतीय दूतावासांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या ४३ संशयितांची ओळख पटवली आहे. NIA identifies Khalistani who attacked Indian embassies abroad
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने क्राउडसोर्सिंगचा वापर करून सर्व संशयितांचा शोध घेतला आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने या वर्षी जूनमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताब्यात घेतले होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या वर्षी दहशतवादी नेटवर्कवर कारवाई करताना, देशभरात 68 प्रकरणे नोंदवून 1000 हून अधिक छापे टाकले आणि 625 आरोपींना अटक केली.
एनआयएच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एजन्सीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 74 आरोपींना शिक्षा सुनावली आहे, यासह 94.70 टक्के दोषसिद्धीचा दर गाठला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App