विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. A happy start to the new year with the chanting of Rama
नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे असे सांगून आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारने राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक निर्णय घेतले आहेत, एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधा वाढवतांना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार, उद्योगपतींचं ओढा दिवसागणिक वाढतो आहे. नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत.
नव्या वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरु होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठं व्हिजन ठेवलं आहे. ही सगळी वाटचाल एकट्याने नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागानं आणि योगदानानं होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवण्याचं आवाहन करुन आपले विचार नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App