विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : Odisha High Court ओडिशा उच्च न्यायालयाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या शेख आसिफ अली याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतरित केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. नियमित नमाज पठण, पश्चात्ताप आणि सुधारलेल्या वर्तनाचा दाखला देत न्यायमूर्ती एस. के. साहू आणि न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांच्या खंडपीठाने हा धक्कादायक निर्णय दिला आहे.Odisha High Court
ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने १०६ पानी निकालात हा गुन्हा ‘दुर्लभात दुर्लभ’ नसल्याचे नमूद करत शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले.Odisha High Court
न्यायालयाने म्हटले की, आरोपी नियमित नमाज पठण करतो, पापाची कबुली दिली आहे आणि तुरुंगात धार्मिक जीवन जगत आहे. त्याला मृत्यू होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, सशर्त सवलती मिळणार नाहीत.या निर्णयावर कायदा तज्ज्ञ, पीडितेचे कुटुंब आणि सामान्य जनता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“अशा क्रूर गुन्ह्यासाठी धार्मिक वर्तनाचा आधार घेणे पीडितेला अन्यायकारक आहे,” अशी प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी दिली आहे. सामाजिक माध्यमांवरही हा निर्णय धार्मिक सहानुभूती दाखवणारा आणि पक्षपाती असल्याचा आरोप होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘rarest of rare’ निकषांत हा गुन्हा बसत नसल्याचे उच्च न्यायालयाने मानले, पण यावरही वाद निर्माण झाला आहे. पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App