शरद पवार – दिलीप वळसे पाटलांच्या भेटीगाठी; पण (भाजपच्या परवानगीशिवाय) विलीनीकरणाची नाही संधी!!

नाशिक : शरद पवार – दिलीप वळसे पाटलांच्या भेटीगाठी; पण (भाजपच्या परवानगीशिवाय) विलीनीकरणाची नाही संधी!!, हेच राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो प्रसिद्ध झाला. त्याबरोबर मराठी माध्यमांना पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची उकळी फुटली. मराठी माध्यमांनी लगेच विलीनीकरणाच्या अटकळी बांधणाऱ्या बातम्या दिल्या.

– वळसे पाटलांच्या कार्यालयाचा खुलासा

दिलीप वळसे पाटलांच्या शरद पवार भेटीला राजकीय रंग चढल्याबरोबर वळसे पाटलांच्या कार्यालयाने ताबडतोब खुलासा केला. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी सामाजिक आणि अन्य विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नव्हता, असा दावा वळसे पाटलांच्या कार्यालयाने केला. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुद्धा तसाच खुलासा केला. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते शरद पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा भेटले. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी त्यांच्याकडे गेले. पण त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नव्हता, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

– पटेल – तटकरे यांच्याही पवार भेटी

दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेण्यापूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते सुद्धा शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक वर गेले होते. पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पवार भेटीला सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षाची पार्श्वभूमी होती. सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत फक्त सदस्य म्हणून स्थान दिले. पण त्यांच्या नावांपुढे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशी पदे लिहिली नव्हती. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या मनात खदखद वाढली. या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले गेले, पण या दोन्ही नेत्यांनी त्याही बातम्यांचा इन्कार केला होता.

– भाजपची परवानगी नाही तोपर्यंत…..

या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याने पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उकळी फुटली. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी परवानगी दिल्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची टाळी वाजणारच नाही हे उघड सत्य मात्र कुठल्या मराठी माध्यमांनी सांगितले नाही. बाकी शरद पवारांची कुठल्या नेत्याने भेट घेतली किंवा भेट घेतली नाही, तरी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर फरक पडणार नाही. जोपर्यंत भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतून हिरवा कंदील दाखवत नाहीत, तोपर्यंत शरद पवारांची इच्छा असो किंवा नसो आणि सुनेत्रा पवारांची सुद्धा इच्छा असो किंवा नसो, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण शक्य नाही. हा सगळ्यात कळीचा मुद्दा मात्र मराठी माध्यमांनी त्यांच्या बातम्यांमधून सांगितला नाही.

Sharad Pawar and Dilip Walse Patil’s Meetings

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात