Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये राहणे असह्य झाले आहे.दिल्लीत सध्या नवीन संकट आले आहे. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. मात्र हा लॉकडाऊन कोरोनाचा नाही तर दुसरा लॉकडाऊन लागला आहे तो म्हणजे प्रदूषणचा लॉकडाऊन. Delhi Lockdown: Unbearable Delhi-Troubled Delhiites! Pollution lockdown in Delhi! Appeal to citizens not to leave their homes …

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता प्रदूषणामुळे खालावत चालली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीकरांना श्वास घेणे कठीण होत आहे. पहाटे धुक्याच्या चादरीमध्ये लपेटलेल्या दिल्लीत वायू प्रदूषणाने कळस गाठला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने (CPCB) दिल्लीकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.



दिल्लीमध्ये कोरोनानंतर आता प्रदूषणाने कहर केला आहे. शनिवारी दिल्लीच्या हवेमध्ये AQI 499 रेकॉर्ड करण्यात आला आहे. ही हवा शुक्रवारच्या हवेपेक्षा खराब आहे. हवेच्या गुणवत्तेचा सूचकांक सायंकाळी 4 वाजता AQI 471 एवढा नोंदवला गेला होता. गुरुवारी AQI 411 एवढा नोंदवला गेला. दिल्लीची हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिल्लीकराना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच सरकारी आणि खासगी कार्यालयांना देखील या हवा प्रदूषणाला कमी करण्यासाठी वाहनांचा वापर 30 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी वाहनांचा वापर कमी करुन घरातूनच काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करावे, कार पुलिंग, फील्डवरील कामे कमी करावे असे पर्याय सूचवण्यात आले आहेत.

Delhi Lockdown: Unbearable Delhi-Troubled Delhiites! Pollution lockdown in Delhi! Appeal to citizens not to leave their homes …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात