दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला.राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहेSection 144 enforced in Amravati city, Collector Pavneet Kaur issued a curfew order
विशेष प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे. दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला.राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे.
आज अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. दरम्यान अमरावती आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी शहरात कलम 144 लागू केली असून जमावबंदीचे आदेश दिले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे की , महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवणू आणली आहे.तसेच दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
अमरावतीतल्या बंददरम्यान, दुकानं बंद केली नाहीत म्हणून आंदोलकांकडून 4 -5 दुकानांची जाळपोळ करण्यात आली. दुकानदारांवर दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली.यावेळी पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App