विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडेंचा उल्लेख दाऊद वानखेडे असा केला होता. तर समीर वानखेडे मुस्लिम असल्याचं म्हटलं होतं. नवाब मलिकांच्या या आरोपांच्या विरोधात ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अंतरिम याचिकेवरची सुनावणी कोर्टाने राखून ठेवली आहे.या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं असं म्हणत हायकोर्टाने नवाब मलिक यांना फटकारले आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अॅड. अर्शद शेख यांनी आज कोर्टापुढे विविध कागदपत्रं सादर केली. ज्ञानदेव वानखेडे हे हिंदू आहेत त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
दुसरीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जो जन्मदाखला ट्विट केला होता त्याकडेही अर्षद शेख यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. ‘नवाब मलिक यांनी समीर वानखेडेच्या जन्मदाखल्याची फोटोकॉपी ट्विट केली. ती व्हेरिफाईड आहे का? हे तपासणं त्यांना आवश्यक वाटलं नाही का? जन्माचा दाखला खरा असला तरीही दाऊद हे नाव त्याच दस्तावेजाच्या कोपऱ्यात ज्ञानदेव असे दुरूस्त केले होते हेदेखील त्यांना (मलिक) माहित होतं. नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या दाखल्यातली सगळी नावं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आली आहेत. समीर हे नाव तर कॅप्स लॉकमध्ये आहे’ याकडे अर्शद यांनी लक्ष वेधलं.
यानंतर न्यायमूर्ती जामदार यांनी मलिक यांची बाजू मांडणारे अॅड. अतुल दामले यांना जन्म दाखल्याबाबत विचारणा केली. न्यायमूर्ती जामदार यांनी विचारले की, एससी म्हणते की जर सार्वजनिक दस्तावेज असेल तर ठीक आहे, परंतु सत्यापन करणे आवश्यक आहे. अन्यथा हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. ‘तुमचे अशील विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात. त्यांनी अधिक सावधगिरी घ्यायला हवी होती’ जामदार म्हणाले.
ज्ञानदेव वानखेडे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. अर्शद शेख यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केला. ‘मलिक यांच्या जावयाला अटक होऊन आठ महिन्यांपर्यंत जामीन मिळू शकला नव्हता. त्या जामिनालाही एनसीबीने आव्हान दिलं आहे. म्हणूनच सूड म्हणून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्याच्याबरोबरच माझ्या पूर्ण कुटुंबालाही लक्ष्य करत बदनामी सुरू केली आहे’.
नवाब मलिक यांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांविषयी भाष्य करत कोर्टाने मलिक यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘तुम्ही आमदार, मंत्री आणि एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात, मग संबंधित कागदपत्राचा आधार घेताना तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक नव्हते का?
कारण त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं,’ असं कोर्टाने म्हटलं आहे.हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांच्याकडून ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी बाजू माडंली. ‘मी काही स्वतः कागदपत्रे तयार केलेले नाहीत. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर जे काही पोस्ट केलं होतं, त्याचाच आधार घेऊन मी ट्विट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App