एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.I condemn this policy of the state government, the final victory is ours – Pravin Darekar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो. कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी. अंतिम विजय हा आपलाच आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने करतो. (2/2) — Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) November 13, 2021
राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो. कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी. अंतिम विजय हा आपलाच आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने करतो. (2/2)
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) November 13, 2021
प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो. कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी. अंतिम विजय हा आपलाच आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने करतो.
ते पुढे म्हणाले, आज मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता राज्यभर पसरले आहे. सरकार मात्र यातून काही मार्ग काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान करीत आहे. असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more