अमरावतीमध्ये शेकडोंचा जमाव रस्त्यावर, तुफान दगडफेक, नवाब मलिक म्हणाले- दोषींवर कारवाई करणार


त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपने बंद पुकारला आहे. बंददरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. Rally against Tripura violence Amravati Mob pelting Stones at shops


विशेष प्रतिनिधी

अमरावती : त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपने बंद पुकारला आहे. बंददरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

हिंसाचारात दोन पोलीस जखमी

त्रिपुरातील जातीय दंगलीच्या निषेधार्थ काल महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. यादरम्यान काही ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. नांदेडमध्ये हिंसक जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली, ज्यात 2 पोलीस जखमी झाले. निदर्शनादरम्यान सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मालेगावातही बराच गदारोळ झाला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जैयाब चौकातील दुकानांच्या खिडक्यांच्या काचेवर दगडफेक करण्यात आली असून आता दुकानदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.



जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई – नवाब मलिक

हिंसाचाराबद्दल मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली हिंसा करणे योग्य नाही. आम्ही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. यात काही अराजक घटक हिंसाचार पसरवण्याचे काम करत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करत असताना त्रिपुराच्या पानीसागरमध्ये जमावाने हिंसाचार केला आणि एक धर्मस्थळ, घरे आणि दुकानांचे नुकसान केले होते.

Rally against Tripura violence Amravati Mob pelting Stones at shops

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात