रझा अकादमीच्या मोर्चांनंतर संजय राऊत यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शंका; पण ती हाणून पाडण्याचाही इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, भिवंडी, मालेगाव, नांदेड आदी शहरांमध्ये रझा अकादमी आणि जमात ए उलेमा या संघटनांनी मोर्चे काढले. त्याला हिंसक वळण लागून मोठ्याप्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दंगलीच्या दंगलीचे निमित्त करून भाजप राष्ट्रपती राजवट आणू इच्छित आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.₹ त्याच वेळी त्यांनी राष्ट्रपती राजवट लादण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे. Sanjay Raut doubts President’s rule in Maharashtra after Raza Academy rallies; But it is also a warning to strike

महाराष्ट्रात दंगल घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून भाजप राष्ट्रपती राजवट आणू इच्छित आहे. पण ते आम्ही घडू देणार नाही. हा प्रयत्न आम्ही कठोरपणे हाणून पाडू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.



अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोर्चेकऱ्यांना उद्देशून एक छोटे निवेदन केले आहे. मोर्चे काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु काल जे घडले ते योग्य नाही. शांततेत मोर्चे काढले पाहिजेत. त्याला हिंसक वळण लागता कामा नये, असे मलिक यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे एका मोर्चात सहभागी झाल्याचे आणि त्यांनी भाषण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमरावतीत आता काही हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडी सरकार मधले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रातील हिंदू आणि मुसलमान समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Sanjay Raut doubts President’s rule in Maharashtra after Raza Academy rallies; But it is also a warning to strike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात