त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे निमित्त करून मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये पोलिसांवर दगडफेक, दंगे


प्रतिनिधी

मालेगाव : त्रिपुरा येथे अल्पसंख्यांकावरील कथित अन्याय तसेच उत्तर प्रदेशात एका राजकीय नेत्याने केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून आज मालेगाव तसेच नाशिक शहरात बंद पुकारण्यात आला होता. नाशिकला बंद शांततेत पार पडला. मात्र मालेगावला काही कार्यकर्त्यांमुळे बंदला गालबोट लागले. तसेच अमरावती आणि नांदेडमध्येही मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.Stone pelting, riots in Malegaon, Amravati, Nanded on the pretext of alleged violence in Tripura

यासंदर्भात रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे बंद पुकारण्यात आला होता. बंदला मालेगाव शहरात गालबोट लागले. बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने सुरवातीला चहा टपरी, हॉटेल व बसस्थानक परिसरात बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी तणाव वाढल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस व जमाव समोरासमोर आला. जमावातील काही कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली. दगडफेक केली. त्यामुळे शहराच्या पुर्व भागात सध्या तणावपुर्ण शांतता आहे.यासंदर्भात अपशब्द वापरणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी. अल्पसंख्यांक समाजावरील होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालावा. हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. शहराच्या पुर्व भागातील रिक्षा, पॉवरलुम, विविध बाजारपेठा, व्यवसाय पुर्णपणे बंद होते. दुध व मेडीकल वगळता बहुतांश व्यवहार बंद होते.

अमरावती, नांदेडमध्येही रझा अकादमीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. त्यावेळी घोषणाबाजी झाली आणि काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली. त्रिपुरातील घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रात हिंसाचार घडविणार्‍यांना कायदेशीर कारवाई करून जरब बसवा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Stone pelting, riots in Malegaon, Amravati, Nanded on the pretext of alleged violence in Tripura

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण