BHOPAL MP: वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन- हबीबगंज नव्हे-आता शेवटची हिंदू रानी ‘रानी कमलापति’ रेल्वे स्टेशन !पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण; पहा फोटो


  • मध्य प्रदेशातील भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.

  • शिवराज सरकार यांनी यासाठी केंद्राला पत्र लिहिले होते.त्याला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. BHOPAL MP: World class railway station – not of Habibganj – now the last Hindu queen ‘Rani Kamalapati’ railway station! Prime Minister Modi will make a public dedication; See photo

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळच्या वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक तयार झाले आहे.पुर्वी हबीबगंज असे नाव असलेल्या या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे.  मध्य प्रदेशातील नागरिकांनी यासाठी प्रयत्न केले त्यानंतर शिवराज सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.त्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आता हे स्थानक राणी कमलापती रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

काय आहे पत्र?

सध्या रेल्वे स्थानकाचे नाव हबीबगंज रेल्वे स्थानक असून ते बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक करण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र मध्य प्रदेशच्या परिवहन विभागाने केंद्र सरकारला लिहिले. 15 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या वर्ड क्लास रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.

हे स्टेशन 450 कोटी खर्चून तयार करण्यात आले आहे.  हे देशातील पहिले स्थानक ठरले आहे जेथे प्रवाशांना विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळू शकतात.  या स्थानकावर लोकांना गर्दी न होता ट्रेनच्या बर्थपर्यंत पोहोचता येणार आहे.
जे प्रवासी स्थानकावर उतरतील ते थेट स्थानकाबाहेर दोन वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतील..

का ठेवले हे नाव – राणी कमलापती ?

  • हबीबगंज या नावाला कुठलाही इतिहास नव्हता .
  • आता हबीबगंज स्थानक जागतिक दर्जाचे करण्यात आले, पण दशकांनंतरही स्थानकाच्या नावाबाबत इतिहासाशी निगडित काहीही नव्हते.
  • स्थानकाला हबीबगंज असे नाव का पडले याबाबतही स्पष्ट माहिती नाही.
  • त्यामुळे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी रहिवाशांकडून अनेक दिवसांपासून होत होती.
  • आता 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन होणार आहे .
  • या स्थानकालाही नवीन नाव मिळणार आहे. आता हे स्थानक राणी कमलापती या नावाने ओळखले जाणार आहे.

देशभरात १५ नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जात असल्याने भोपाळ संस्थानातील राणी कमलापती यांच्या नावाचाही विचार करण्यात आला.

ज्यावर जवळपास सर्वांचेच एकमत झाले. त्यानंतरच राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला.  16 व्या शतकात भोपाळ हे गोंड शासकांच्या अधिपत्याखाली होते असा उल्लेख प्रस्तावात आहे. गोंड राजा सूरज सिंह शाह यांचा मुलगा निजाम शाहचा विवाह राणी कमलापतीशी झाला होता.

राणीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत आक्रमकांना धैर्याने तोंड दिले.  गोंड राणीच्या स्मृती अबाधित ठेवण्यासाठी आणि तिच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, राज्य सरकारने 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त हबीबगंज स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

BHOPAL MP : World class railway station – not of Habibganj – now the last Hindu queen ‘Rani Kamalapati’ railway station! Prime Minister Modi will make a public dedication; See photo

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण