अमरावतीत शांतता हवी; हिंदूंची दुकाने टार्गेट करणार्‍या दंगेखोरांवरही कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी


प्रतिनिधी

नागपूर : अमरावतीत त्रिपुरातील कथित हिंसाचारावरून मोर्चेकऱ्यांनी काळजी दंगल केली, त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अमरावतीत शांतता टिकली पाहिजे, असे परखड मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.We condemn protests&violence happening in Maharashtra. Tripura Police have exposed fake photos posted on social media.

अमरावतीत सरकारी पक्षाच्या नेत्यांनी काल मोर्चेकर्‍यांनी समोर भडकाऊ भाषण केले त्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. दोन्ही समाजांनी सामंजस्याने काम केले पाहिजे. त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्यावरून मोर्चे काढणे मुळात गैर होते. त्रिपुरात जी मशीद जाळण्यात आली अशा अफवा पसरवल्या त्या मशिदीचे फोटो त्रिपुरा सरकार आणि पोलिसांनी जारी केले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर तिथे कारवाई केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

आता महाराष्ट्रात या मुद्द्यावरून मोर्चे काढून दंगल घडविणे हे गैर होते. महाराष्ट्र सरकारने या दंगेखोरांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्रिपुरातल्या न घडलेल्या घटनेचे निमित्त करून हिंदूंची दुकाने टार्गेट करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

We condemn protests&violence happening in Maharashtra. Tripura Police have exposed fake photos posted on social media.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात