KANGNA HITS TROLLERS : हा मुद्दा फक्त भाजपचा अजेंडा का असावा? हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे ! …तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते ; रोखठोक कंगना …


जो चोर है उनकी तो जलेगी म्हणत कंगनाने दिले सडेतोड उत्तर  KANGNA HITS TROLLERS: Why should this issue be the only agenda of BJP? This should be the agenda of the country! … so I return the Padma Shri award; Cash bracelet


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कंगना रणौतने एका मुलाखतीत स्वातंत्र्याबाबत एक वक्तव्य केलं होतं.त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला .त्याच्या छोट्या छोट्या क्लीप्स व्हायरल करण्यात आल्या .यावरून कंगनाला बरच काही सुनावण्यात आलं .तीला ट्रोल करण्यात आल मात्र कंगनाने परत आपल्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मी जी मुलाखत दिली त्यामध्ये मी कोणत्याही शहिदाचा किंवा कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे हे जरी मला कुणी दाखवलं तरीही मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन.



या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, ‘काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.’

कंगनाने एका मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं की 1947 ला आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य नव्हतं तर ती एक भीक होती. खरं स्वातंत्र्य आपल्याला 2104 ला मिळालं. त्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली. एवढंच नाही तर तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याचीही मागणी होऊ लागली.

आता या सगळ्या वादावर कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. पुरस्कार परत करण्याची मागणी करणाऱ्यांना तिने उत्तर दिलं आहे.

काय म्हणते कंगना ?

मी माझ्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे की स्वातंत्र्यासाठी पहिलं संघटित युद्ध 1857 ला झाले. ही बाब मलाही माहित आहे, मात्र मला 1947 ला कोणती लढाई झाली ते माहित नाही.

जर मला कुणी या प्रकरणी माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करते, माफीही मागेन असं आव्हान आता कंगनाने दिलं आहे.

कंगनाचे प्रश्न…

मी शहीद राणी लक्ष्मीबाईसारख्या सिनेमात काम केलं आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन झालं आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिण पंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं?

महात्मा गांधी यांनी भगत सिंग यांना मरू का दिलं?

सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली?

त्यांना गांधींजींचा पाठिंबा कधीच का मिळाला नाही?

इंग्रजांनी विभाजन का केलं?

भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत का होते?

मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती कुणी देईल का?

मुलाखतीच्या छोट्या छोट्या क्लिप व्हायर करण्यात काहीही अर्थ नाही. माझं संपूर्ण म्हणणं दाखवा आणि पुढे येऊन सगळं सत्य सांगा, मी सगळ्या परिणामांना सामोरी जायला तयार आहे. असंही कंगनाने आता म्हटलं आहे.

2014 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे वक्तव्य जी मी केलं. मी म्हणाले होते की आपल्याकडे दाखवण्यासाठी स्वातंत्र्य असले तरी भारताच्या चेतनेला आणि विवेकाला 2104 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

तेव्हा एक मृत असलेली सभ्यता जिवंत झाली आणि त्या सभ्यतेने पंख पसरले आणि आता ती सभ्यता जोरात गर्जना करत आहे.

आज पहिल्यांदा लोक इंग्रजी न बोलता किंवा छोट्या शहरातून आलेले किंवा ‘मेड इन इंडिया’ उत्पादन बनवल्याबद्दल आपला अपमान करू शकत नाही.

त्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लेकिन जो चोर हैं उनकी तो जलेगी कोई बुझा नहीं सकता। जय हिंद!

KANGNA HITS TROLLERS: Why should this issue be the only agenda of BJP? This should be the agenda of the country! … so I return the Padma Shri award; Cash bracelet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात