लाईफ स्किल्स : कधी तरी मनाचा आवाजही ऐका


आजकाल आयुष्य इतकं गतिमान झाले आहे की, माणसांना घरातल्या घरात एकमेकांशी बोलायलादेखील वेळ मिळत नाही. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झालेला दिसून येतो. हे व्यस्त राहणं नियमिततेचा भाग असला तरी, वेळात वेळ काढून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माणूस व्यस्त असलेला दिसून येतो. आजूबाजूच्या घटना, घडामोडी या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपसूकच काही क्षणातच पोहोचतात. एकमेकांना सण-समारंभाच्या निमित्ताने भेटणे, एकत्र जमणे, गप्पा मारणे, विचारांची देवाण-घेवाण करणे, वरचेवर दुर्मीळ होत चालले आहे.Listen to the voice of the mind at some point

मोबाईलमुळे माणसे जवळ येत आहेत. संवादाच्या रूपाने त्यांच्यात संभाषण देखील होते, मात्र कुटुंबात वेळ देणे, नातेवाइकांना वेळात वेळ काढून भेटणे, यासाठी वेळेचा अभाव दिसून येतो. माणसं मोबाईलमुळे जवळ आहेत, मात्र ती डिजिटली. मनाने कितपत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. जर माणसंच इतकी एकमेकांपासून दूर चालली आहेत, तर आपण स्वत: एकमेकांपासून किती दूर चाललो आहोत याचा विचारदेखील कुणाच्या डोक्यात आला नसेल. तुम्ही स्वत:शी कधी बोललाय का? शांतपणे खिडकीत बसून स्वत:शी हितगुज साधलेय का? डोळे बंद करून दृष्टीपटलावर पडणारी वर्तुळे मन लावून अनुभवली आहेत का?

कधीतरी अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केलाय का? याचं उत्तर बहुधा सर्वाना नाही, असंच मिळालं असेल. आपण विनाकारण विविध गोष्टी डोक्यात विचारांच्या रूपाने बाळगतो. सतत स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण, काही गोष्टी वायफळ असतात. ज्याची आपण स्वत:ला विनाकारण सवय लावून घेतलेली असते. जसे की, टीव्ही, मोबाईल सतत चालूच असतात. आपण बघत नसलो तरी टीव्ही चालू ठेवून कामं करण्याची काहीजणांना सवय असते.

पण, त्यामुळे आपले कान, मेंदू यावर ताण पडतो. हे कोणाच्याच लक्षात येत नाही आणि ते एक व्यसनच बनून जाते. जे सुटता सुटत नाही. कधी तरी मनाचा आवाज ऐका, खूप काही सांगून जातो. आत्मचिंतन करून अंतर्मनाचा आवाज ऐकणे, स्वत:च स्वत:शी संवाद साधणे खूप गरजेचे आहे. तरंच आपल्याला कळते आपण काय करतोय, आपण कसे वागतोय, जे वागतोय, करतोय ते विचारांती आहे ना, आपण कुठे चुकत तर नाही ना, असल्यास कुठे सुधारणा करायला हवी? याचा अंदाज येतो. स्वत:ला जाणून घ्याल, तर स्वत:ला ओळखाल. या धावत्या जगात स्वत:चे स्थान निर्माण करू शकाल.

Listen to the voice of the mind at some point

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात