नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी नाते देव आणि भक्ताचे…!! सावरकरांच्या असंख्य आठवणींचा खजिना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे होता. 1938 मध्ये बाबासाहेब पुरंदरे हे सावरकर यांना पहिल्यांदा भेटले. त्यानंतर सावरकरांच्या अखेरपर्यंत म्हणजे 1966 पर्यंत त्यांच्या अनेक भेटी होत राहिल्या. त्या सर्व आठवणी बाबासाहेबांच्या मनात अतिशय ताज्या होत्या.Memories of Babasaheb: Savarkar had said, if you want to destroy, then go beyond Kabul and kill Abdali’s family
त्यातलीच एक आठवण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी जागविली आहे. निमित्त होते प्रख्यात चरित्रकार विक्रम संपत यांनी लिहिलेल्या “सावरकर : विस्मृतीचे पडसाद” या अनुवादित ग्रंथाच्या प्रकाशनाचे. 9 सप्टेंबर 2021 ला ते बाबासाहेबांच्या हस्ते पुरंदरे वाड्यात करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे हे दोघेही त्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे गेले होते.
त्यावेळी मंजिरीताईंनी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणी जागविण्याची विनंती केली होती. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते, “सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेजच…!! आजच्या तरुण पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत.
त्याच वेळी सावरकरांच्या अनेक आठवणी बाबासाहेबांनी सांगितल्या. सनातनी लोकांना सावरकरांचे वावडे होते. पुण्यात एक जोशी नावाचे गृहस्थ होते. ते कडक सनातनी होते. ते उघडपणे म्हणायचे आमचे राज्य आले तर सावरकरांना मी भर रस्त्यात फाशी देईन. हे सावरकरांना समजल्यावर सावरकर म्हणाले होते, या मुकट्यापायी तुम्ही मुकुट दवडलेत. म्हणजे सोवळ्याओवळ्याच्या अतिरेकाने तुम्ही राजसत्ता घालवल्यात आणि आता एका सावरकरांना फाशी द्यायचे स्वप्न पाहत आहेत.
अरे जर तुम्हाला नाशच करायचा असेल तर ज्या अब्दालीने भारताचा नाश केला त्याच्या अफगाणिस्तानात काबुल कंदाहारच्या पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा नाश करा ना…!!, असे जळजळीत उद्गार सावरकरांनी काढले होते, अशी आठवण बाबासाहेबांनी सांगितली होती. ही आठवण मंजिरी मराठे यांनी “हिंदुस्थान पोस्ट”मध्ये लिहिली आहे.
बाबासाहेबांनी त्यावेळी ते पुस्तक बारकाईने पाहिले. त्यातला सावरकरांचा तरुणपणातला त्यांना आवडलेला फोटो बाबासाहेबांनी रणजित सावरकर आणि मंजिरीताईंना आवर्जून दाखविला. पुस्तकाची किंमत ते शोधत होते. ती त्यांना दिसली नाही तेव्हा त्यांनी एक हजार रुपये मंजिरीताईंजवळ दिले. ही शिवमय झालेल्या बाबासाहेब पुरंदरे यांची आमच्यासाठी अनमोल आठवण आहे, असे मंजिरीताईंनी आवर्जून लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more