विज्ञानाचे डेस्टीनेशन्स :आता चक्क खनिजयुक्त पाण्यातून लिथियम वेगळे करता येणार…


चिली, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या निवडक देशांत लिथियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जगभरातील ८० टक्के लिथियम या चार देशांतूनच येते. इतर सर्व देशांना या चार देशांवरच लिथियमसाठी अवलंबून राहावे लागते.सर्व उपकरणांचा अविभाज्य भाग असलेल्या बॅटरी तयार करण्यातील एक महत्त्वाचा घटक लिथियम हा असतो. बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांना काही लाख टन लिथियमची गरज भासते. आता खनिजयुक्त पाण्यातून लिथियम वेगळे करण्याची प्रक्रिया शोधण्यात आल्याने नवी व्यवस्था अस्तित्वात येऊ शकते.Lithium can now be separated from mineral water

जर्मनीतील शास्त्रज्ञांनी ऱ्हाईन खोऱ्यातील कड्या-कपारीतून वाहणाऱ्या पाण्याचा शोध घेतला. भरपूर क्षारयुक्त पाण्याचे झरे त्यांना काही ठिकाणी सापडले. अशा प्रकारच्या पाण्याचा उपयोग औष्णिक ऊर्जा आणि हीटिंग प्लांटमध्ये करण्यात येत आहे. या पाण्यामध्ये इतर खनिजांसोबत द्रवरूप लिथियमही उपलब्ध असल्याचे संशोधकांना आढळून आले. प्रतिलिटर पाण्यामध्ये २०० मिलीग्राम एवढे त्याचे प्रमाण होते. त्यांनी पाण्यातून लिथियम वेगळे करण्याची पद्धत विकसित केली आहे.

पाण्यातून लिथियम वेगळे काढण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा खनिजयुक्त पाण्यातून लिथियमचे विद्युतभारीत कण अर्थात आयन वेगळे करणे हा आहे. दुसऱ्या टप्प्यात त्याची कॉन्स्ट्रेशन वाढविण्यात येते, त्यामुळे मिठाप्रमाणे लिथिमय खाली बसते. दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात प्रचलित असलेल्या लिथियम खनन पद्धतीपेक्षा ही नवी पद्धत चांगली असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्मनीमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत सुमारे दोन अब्ज लिटर पाणी जमिनीखालून उपसून वापरण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.

तसेच खनिजांनी समृद्ध असलेल्या दगडांमधून लिथियम मिळवायचे झाल्यास ते दगड डोंगरांमधून फोडून काढावे लागतील. म्हणजेच डोंगरांत नव्या दगड खाणी शोधाव्या लागतील. त्यातून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान तर होईलच आणि ते जास्त खर्चिकही असेल, तसेच डोंगरातील नैसर्गिक स्रोतांना धक्का बसेल. निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता नव्या पद्धतीतून लिथियम मिळविणे शक्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Lithium can now be separated from mineral water

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती