तुम्ही गुंतवणुकीसाठी ज्याच्यावर अवलंबून राहणार आहात त्याची पात्रता व अनुभव तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. त्याची पात्रता व बौद्धिक क्षमता फार महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्याकडे संबंधित शिक्षणाची पदवी असणे बंधनकारकच आहे. त्याचा कामाचा अनुभव तुमच्या पैशांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास उत्तम दिशा देऊ शकतो. याशिवाय त्याच्या पूर्वी केलेल्या कामांची यादी नक्की विचारा. यावरून त्याची पोर्टफोलिओ हाताळण्याची क्षमता तसेच पात्रता दोन्हीचा अंदाज येऊ शकतो.Make the most of financial investments
तुमचा आर्थिक सल्लागार विविध उत्पादनांच्या विक्रीवरील मिळकत कशी ठरवतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो तुमच्याकडून अतिरिक्त आकारणी करत आहे का ? उदा. एजंटने विम्यात गुंतवण्यासाठी १० हजार रुपये घेतले व त्यावर ३० टक्के कमिशन असेल तर प्रत्यक्षात ग्राहकांचे फक्त ७ हजार रुपये गुंतवले जातात. हे लक्षात घ्यायला हवे. तुमच्यासाठी व कुटुंबासाठी योग्य योजना आखताना वा निवडताना आर्थिक सल्लागाराकडे पुरेसे पर्याय आहेत का याची तुम्हाला माहिती असणे चांगले. जर त्याची शिफारस काही उत्पादनांपुरती मर्यादित आहे का?
तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर त्याचा परिणाम होतोय का? तुमच्या आर्थिक प्रश्नांवर उपाय सुचवताना वित्त सल्लागार पुरेसा लवचिक आहे का? तो तुमची जोखीम घेण्याची कुवत तो तपासतो ? या सर्व बाबी आर्थिक मध्यस्थी निवडताना न चुकता विचारात घ्या. आर्थिक उत्पादनांशी निगडित अचूक व संपूर्ण माहिती तुम्हाला देणे ही सल्लागाराची जबाबदारी असते. जर एखाद्या उत्पादनाविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल तर त्याविषयी अधिक माहिती गोळा करा. एखाद्या उत्पादनाची आतापर्यंतची कामगिरी जरी समाधानकारक असली तरी भविष्यात त्याची उपयुक्तता किती असेल हे तुम्हाला माहीत हवे.
उदा-जोखीम, गुंतवणुकीची मर्यादा, फायदे-तोटे व तुमच्या गरजांसह त्याची उपयुक्तता हे मुद्दे अशा वेळी अवश्य तपासा. एखाद्या उत्पादनाची खरेदी किंवा विक्री इतक्यापुरताच मध्यस्थीचा संबंध नसून तुमच्या पोर्टफोलिओची वेळोवेळी तपासणी करणेही त्यांचे काम आहे. तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ती कृती झाली पाहिजे, त्यासाठी मध्यस्थीने वेळोवेळी तुम्हाला आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more