नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची अधिदैवते…!! छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्य क्रमात जिथे जिथे गेले होते, त्यांचे पवित्र चरण ज्या मातीला लागले त्या प्रत्येक स्थळी बाबासाहेब पुरंदरे यांनी जाऊन दर्शन घेतले होते. Babasaheb had expressed his gratitude after visiting Bhagur’s Savarkar birth place !!
त्यांची तशीच पूज्य भावना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी होती. 10 नोव्हेंबर 2003 या दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांनी भगूरच्या सावरकर वाड्याला भेट दिली होती. त्यावेळी वाड्यातल्या सावरकर जन्मभूमीचे दर्शन घेऊन आपल्याला अत्यानंद झाला आणि धन्यता वाटली. इथली आस्था आणि व्यवस्था खरोखरच सुखद आहे. या पवित्र भूमीस दंडवत, अशा भावना बाबासाहेबांनी व्यक्त केल्या होत्या. शिवनेरीवर शिवजन्मस्थळी गेल्यानंतर जो आनंद होतो आणि धन्यता वाटते तीच मला सावरकर जन्मस्थळी आल्यावर वाटली, असे पत्र बाबासाहेबांनी स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले आहे.
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने शिवशाहीरांचा हा “पत्र ठेवा” जपून ठेवला असून तो सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी thefocusindia.com साठी उपलब्ध करून दिला आहे. बाबासाहेबांच्या घडणदार, वळणदार, सुघट अक्षरातून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीची परमोच्च पूज्य भावना या पत्रातून व्यक्त झालेली आपल्याला दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more