शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं निधन, पीएम मोदी, सीएम ठाकरे, गडकरी व फडणवीसांसह देशभरातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली, वाचा सविस्तर…


 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज राजकारण्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.Babasaheb Purandare Death PM Modi CM Thackeray Pays Tribute


प्रतिनिधी

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. सकाळी साडेआठ वाजता बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. तर सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी जागवल्या आठवणी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मन व्यथित झालं- अमित शाह

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, “बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर मी खूप व्यथित झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तरुण पिढीच्या हृदयात रुजवल्या.”

असा शिवआराधक शोधूनही सापडणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

 

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते – शरद पवार

महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून जनजागृती करून ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली आणि नव्या पिढीला याबाबत आस्था निर्माण केली असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली. शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवलं, अशा शब्दांत शरद पवारांनी शिवशाहीर पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

मनाला अतिशय वेदना होत आहेत – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून लिहिले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत.

महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार

 

बाबासाहेबांचे जाणं अत्यंत दु:खद – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आपण आमचे जीवन समृद्ध केलेत – संजय राऊत

Babasaheb Purandare Death PM Modi CM Thackeray Pays Tribute

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात