BABASAHEB PURANDARE :१०० वर्ष …२९ जुलै १९२२ ते १४ नोव्हेंबर २०२१ ! छत्रपतींना घराघरात पोहोचवणारे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेचा इतिहास …


इतिहासलेखक बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं. BABASAHEB PURANDARE: 100 years … 29 July 1922 to 14 November 2021! History of Babasaheb Purandare, the historian who brought Chhatrapati to his home …


विशेष प्रतिनिधी

पुणे : १०० वर्ष …२९ जुलै १९२२ ते १४ नोव्हेंबर २०२१ भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि बाबासाहेबांची १०० …असा विलक्षण योग बाबासाहेब पुरंदरेच्या बाबतीत घडला.शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात अन् मनामनात खर्या अर्थाने पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरेंनीच ! म्हणूनच अख्या जगात ते
इतिहास संशोधक, ‘शिवशाहीर’ आणि लेखक म्हणून ते ओळखले जायचे.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख शिवशाहीर म्हणून चिरपरिचित आहे. जाणता राजा ह्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केलं. हे महानाट्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गोव्यासह देशभर आणि देशाबाहेरही नावाजलं गेलं. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकाचे १२०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक ५ भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला.

पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केलं. २०१५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारहून अधिक व्याख्यानं दिली. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले हा बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय होता.

२०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण तर २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या १० लाख रकमेपैकी फक्त १० पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात १५ लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. बाबासाहेब शंभरीत होते. त्यांनी फक्त शिवरायांचाच इतिहास लिहिला असं नाही तर पेशव्यांच्या इतिहासावरही त्यांनी प्रकाश टाकला.

बाबासाहेब -बाळासाहेब-शिवसेना

बाबासाहेब पुरंदरे यांचे राजकीय संबंधही महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. च्या काळात बाबासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीत महत्वाचं योगदान दिलं.

बाबासाहेब पुरंदरेंची ग्रंथसंपदा

बाबासाहेब पुरंदरेंनी तरुण वयातच शिवरायांचा इतिहास लिहायला सुरुवात केली. नंतर तेच लिखाण ‘ठिणग्या’ नावानं पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात आलं. राजा शिव छत्रपती आणि केसरी अशी इतर पुस्तकंही त्यांनी लिहिली.

नारायणराव पेशवे यांच्यावरही बाबासाहेबांनी लिखाण केलं. पण बाबासाहेबांचं सर्वात मोठं काम मानलं गेलं ते जाणता राजा हे महानाट्य. ते १९८५ मध्ये नाट्यमंचावर आलं. तेव्हापासून १२०० पेक्षा जास्त प्रयोग जाणता राजाचे झालेले आहेत. महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्ये जाणता राजाचे शो झाले. तसेच आग्रा, दिल्ली, भोपाळ, अमेरीका इथेही हे महानाट्य सादर केलं गेलं. जवळपास २०० कलाकार हा प्रयोग सादर करायचे. त्यात हत्ती, घोडे, उंट यांचाही समावेश असायचा. त्यामुळे स्टेजवर एका नाटकाचा प्रयोग होतो असं न वाटता प्रत्यक्षात छत्रपतींचा काळ उभा रहात असे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर त्याचे प्रयोग सुरु व्हायचे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून २००७ साली त्यांना मध्य प्रदेश सरकारनं कालिदास सन्मान दिला.

सावरकर अन् बाबासाहेब भेट

बाबासाहेबांनी शिवकालीन इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी झपाटल्यासारखं काम केलं. पण, त्यांच्या या झपाटलेपणामागे बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत झालेल्या भेटीलाही अनन्यसाधारण महत्व आहे. लहानपणी बाबासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकरांची नक्कल करायचे. याची माहिती सावरकरांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना बोलावून घेतलं. त्याचा किस्सा बाबासाहेबांनी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

काय म्हणाले होते बाबासाहेब?

“गणपतराव नलावडे पुण्यातील त्याकाळचे पुढारी होते. त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. एकदा ते मला सोबत घेऊन सावरकर मुक्कामी असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळी सावरकरांचा मुक्काम पुण्यातील केशरीवाड्यात होता. तिथे नलावडे सावरकरांना म्हणाले, ‘तात्या हा पोरगा तुमची उत्तम नक्कल करतो, ऐकायची ना?’ त्यावर सावरकर म्हणाले, ‘हो, कर.'”

मी हुबेहुब सावरकरांचा आवाज आणि हातवारे केले होते. मी केलेली त्यांची नक्कल बघितल्यानंतर सावरकरांनी मला जवळ बोलावून घेतलं.”
“त्यांच्यापासून अंदाजे 15 फुटांच्या अंतरावर उभा होतो. त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो. नमस्कार करण्यासाठी वाकलो. त्यावेळी त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, ‘उत्तम. फारच छान. पण आयुष्यभर केवळ लोकांच्या नकलाच करू नकोस. तुझं स्वतःचं काही असू दे.’ त्या दिवसापासून मी नकला करणं बंद केलं.”

“मला भारतातच पुर्नजन्म मिळावा…”-

या मुलाखतीत बाबासाहेबांनी भारतातच पुर्नजन्म मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. “महत्वाकांक्षी व हौशी माणुस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या ९९ वर्षात परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करुन स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुर्नजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे”, अशा भावना बाबासाहेबांनी व्यक्त केल्या होत्या.

BABASAHEB PURANDARE : 100 years … 29 July 1922 to 14 November 2021! History of Babasaheb Purandare, the historian who brought Chhatrapati to his home …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात