समाजात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात ; त्यांची दखल घ्यायची नसते , शरद पवारांचा विक्रम गोखले यांच्यावर घणाघात


विक्रम गोखले यांच्यावर देखील सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.There are people with perverted attitudes in society; They don’t want to be noticed, Sharad Pawar’s attack on Vikram Gokhale


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरुन कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. असे वादग्रस्त वक्तव्य केलेले असताना देखील गोखलेंनी याच समर्थन केलं आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांच्यावर देखील सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबाबतशरद पवार म्हणाले की, समाजात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात, त्यांची दखल घ्यायची नसते, असे म्हणत शरद पवारांनी विक्रम गोखले यांच्यावर टीका केली.शरद पवार नाशिकमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विक्रम गोखले यांच्यावर टीका केली.

शरद पवार म्हणाले, ‘ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात, अशांच्या वक्तव्यांची नोंद सुद्धा घ्यावी असं मला वाटतं नाही. त्याची नोंद आपण घेऊ नये.त्यांचं बोलणं सोडून द्यायचं असतं”, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

There are people with perverted attitudes in society; They don’t want to be noticed, Sharad Pawar’s attack on Vikram Gokhale

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती