औरंगाबाद पॅटर्न राज्यात राबविला जाणार नाही ; लासिकरणाबाबत राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती


‘लस घेणे हे ऐच्छिक आहे. त्यामुळे जागृती करून,लोकांना समजावून सांगून लसीकरणासाठी त्यांना प्रवृत्त करावे लागणार आहे.The Aurangabad pattern will not be implemented in the state; Rajesh Tope gave important information about vaccination


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबविण्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.परंतु मुख्य सचिवासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की , लस घेणे हे बंधनकारक नाही, सक्तीने लस देणे हे कायद्यानुसार नाही.त्यामुळे औरंगाबाद येथे जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत राबविलेला पॅटर्न राज्यात राबविला जाणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले

पुढे टोपे म्हणाले, ‘लस घेणे हे ऐच्छिक आहे. त्यामुळे जागृती करून,लोकांना समजावून सांगून लसीकरणासाठी त्यांना प्रवृत्त करावे लागणार आहे.दरम्यान राज्यात दहा कोटी लोकांना लसीकरण झाले आहे.यामध्ये सात कोटी लोकांना पहिला डोस तर सव्वातीन कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.सरासरीचा विचार केल्यास ८० टक्के लसीकरण झाले आहे.दरम्यान वीस टक्के लसीकरण आव्हानात्मक आहे.

‘घर घर दस्तक’ व ‘मिशन कवचकुंडल’ मोहीम

पुढे राजेश टोपे म्हणाले की , सध्याच्या परिस्थितीत लसीकरणाबाबत लोकांचे काही गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांना सातत्याने महत्त्व समजून सांगण्याची गरज आहे. तसेच आरोग्य विभाग हे जागृतीचे काम करीत आहे. दरम्यान केंद्राची ‘घर घर दस्तक’ ही मोहीम व ‘मिशन कवचकुंडल’च्या माध्यमातून घरोघरी जाऊन समजावून सांगून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणले जात आहे. यासाठी महसूल, ग्रामविकास, शिक्षण विभागाची मदत घेतली जात आहे.

The Aurangabad pattern will not be implemented in the state; Rajesh Tope gave important information about vaccination

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात