एका युगाचा अस्त : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अखेरच्या निरोपाला मोठी गर्दी


ज्येष्ठ इतिहासकार, छत्रपती शिवरायांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. Funeral on Shivshahir Babasaheb Purandare in at Vaikunthdham SmashanBhumi Pune


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ इतिहासकार, छत्रपती शिवरायांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.

अंत्यदर्शनाला शिवप्रेमींची अलोट गर्दी

दरम्यान, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि असंख्य शिवप्रेमी उपस्थित राहिले. वैकुंठधाम स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता.

वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तोल जाऊन घरात पडल्याने बाबासाहेबांना दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते. मैदानात बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. धार्मिक मंत्रोच्चार करून पार्थिव बाहेर काढलं जाणार आहे. विद्युतदाहिनीत पार्थिवाला अग्नी दिला जाईल.



हयातभर शिवचरित्राचा ध्यास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. जाणता राजा ह्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरांत पोहोचवला. हे महानाट्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गोव्यासह देशभरात नावाजलं गेलं. बाबासाहेबांचा जन्म जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला होता. त्यांनी फक्त शिवरायांचाच इतिहास लिहिला असं नाही तर पेशव्यांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला आहे.

शिवशाहिरांची ग्रंथसंपदा

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

Funeral on Shivshahir Babasaheb Purandare in at Vaikunthdham SmashanBhumi Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात