प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, काँग्रेसची घोषणा


काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.Congress announces candidature of Pragya Satav


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बाबत काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले.

त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते.दरम्यान काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.



तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले. दरम्यान रणपिसे यांच्या निधानाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसमधून अनेक जण स्पर्धेत होते. यावेळी काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचेही नाव विधान परिषदेच्या स्पर्धेत होते. मात्र, काँग्रेसने दिलेला शब्द पाळत रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.

Congress announces candidature of Pragya Satav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात