“हायकोर्टात आपली बाजू मांडावी ; न्यायालय जो आदेश देईल त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे” – अनिल परब


अनिल परब म्हणाले की , संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल.”We should present our case in the High Court; everyone should abide by the order of the court” – Anil Parab



विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हजारो एसटी बस आगारातच उभ्या आहेत.दरम्यान विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी आता नविन समिती नेमण्याची मागणी हायकोर्टात केली आहे.

याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की , संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.



पुढे परब म्हणाले की “मी कामगारांना सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याचे आम्ही पालन करु. मी कर्मचाऱ्यांना अनेक दिवस सांगत आहे की कामावर या आणि आपण चर्चा करु.

प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले आहे. उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर यावर भाष्य करणे योग्य राहील,”निदर्शने करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, न्यायालयासमोर आत्मदहनाची धमकी देणे योग्य नाही. न्याय योग्य पद्धतीने मागायला हवा, असेही परब म्हणाले.

“We should present our case in the High Court; everyone should abide by the order of the court” – Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात