संवेदनशीलता पाळा ; लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या , पडळकरांची अनिल परब यांच्यावर टीका


एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.Follow sensitivity; Give justice to ST employees as soon as possible, Padalkar criticizes Anil Parab


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे.मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी पडळकर म्हणाले की “तीन हजार कर्मचारी कामावर परतले, अशा खोट्या बातम्या अनिल परब वृत्तपत्रात पसरवत आहेत आणि कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडून उद्रेक पसरवण्याचे काम परब करत आहेत. परब खूप चांगले राजकारणी आहेत पण एसटी कर्मचाऱ्यांबाबत असे तुच्छ पद्धतीचे राजकारण त्यांनी करू नये.



पुढे या राजकारणच रूपांतर कुठे हिंसाचारामध्ये किंवा आत्महत्येमध्ये झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील”, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.

“अनिल परब यांच्या असंवदेनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहेत. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखा:ची जाणीव त्यांना अजून देखील होत नाहीये. अनिल परब आपणास विनंती आहे की संवेदनशीलता पाळा व लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, कृपया कुठल्याही पद्धतीचे तुच्छ राजकारण करू नये”, असेही पडळकर म्हणाले.

Follow sensitivity; Give justice to ST employees as soon as possible, Padalkar criticizes Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात