‘काटे रुतले तरी पाऊल पुढेच…’; धनंजय मुंडेंचा जिममधील VIDEO चर्चेत, कमबॅकचे संकेत?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये ते व्यायाम करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी शेअर केलेल्या कवितेमुळे त्यांच्या राजकीय कमबॅकबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत आपण जिमला सुरुवात केल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या आक्रमक भाषणामुळे ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतणार असल्याच्या चर्चांना त्याचवेळी सुरुवात झाली होती.



आता मुंडे यांनी थेट जिममधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी प्रेरणादायी कविता शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे. भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे…’ अशा आशयाच्या या कवितेत संघर्ष, टीका आणि स्वतःशीच सुरू असलेल्या लढ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

https://www.facebook.com/share/r/1F3eFHdHj5/

‘निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे. हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे’, अशा आशयाच्या ओळी मुंडे यांनी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.

त्यामुळे या पोस्टमधून धनंजय मुंडे नेमका कोणता राजकीय संदेश देऊ पाहत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. जिममधील व्हिडिओ आणि त्यासोबतची कविता पाहता मुंडे पुन्हा राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Dhananjay Munde’s gym video sparks buzz; signs of a comeback?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात