प्रस्तावित उजनी धरण प्रकल्पाच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांचे मशाल मोर्चा

विशेष प्रतिनिधी

बारामती : उजनी धरणाच्या पाण्यावर प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर, अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांविरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष शुक्रवारी (ता. २७) मशाल मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला. भीमानगर चौक ते उजनी धरण व्यवस्थापन कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात करमाळा आणि इंदापूर, माळशिरस तालुक्यांसह सोलापूर व पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते. हातात मशाली घेऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी उजनीच्या पाण्यावर स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांचाच पहिला हक्क असल्याची भूमिका मांडत प्रस्तावित प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला.

या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. त्यामुळे उजनीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक राजकीय पाठबळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. उजनी धरण हे केवळ जलसाठ्याचे ठिकाण नसून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या शेती, पिण्याचे पाणी आणि अर्थकारणाचा आधार आहे.



धरणाच्या पाण्यावर अनेक गावांची शेती अवलंबून आहे. अशा परिस्थितीत स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना विश्वासात न घेता धरण परिसरात मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रकल्पांमुळे पाण्याचे उपलब्ध प्रमाण, शेतीसाठीचे आवर्तन, मच्छीमारी व्यवसाय आणि पर्यावरणावर नेमके काय परिणाम होतील, याची शास्त्रीय माहिती सार्वजनिक करावी, अशीही भूमिका मांडण्यात आली.

विशेष म्हणजे, यापूर्वी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उजनीतील प्रस्तावित प्रकल्पाबाबत प्रशासनाकडे २२ प्रश्न उपस्थित करत सर्व संबंधितांची जनसुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर २७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.

Torchlight march by thousands of farmers against the proposed Ujani Dam project

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात