डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट; साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. शरणकुमार लिंबाळेंचे केले अभिनंदन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. लिंबाळे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही मराठी साहित्यविश्वासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या साहित्यलेखनातून मराठी साहित्याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. साहित्य, सामाजिक वास्तव आणि वंचित घटकांचे प्रश्न आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे.

पुण्यात होणाऱ्या या शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या निवडीमुळे आगामी साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Dr. Sharankumar Limbale receives the Chief Minister at his residence.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात