५०० कोटींच्या आरोपांची चौकशी निर्णायक टप्प्यावर? एसआयटीचे सहा अधिकारी मनोज जरांगेंच्या घरी; ऑडिओ क्लिप ताब्यात

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कथित ₹500 कोटींच्या व्यवहाराच्या आरोपप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) तपासाला वेग दिला आहे. दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता एसआयटीच्या 6 अधिकाऱ्यांचे पथक अंकुशनगर येथील मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अधिकारी बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने जरांगे यांच्याकडील संबंधित ऑडिओ क्लिप व इतर पुरावे अधिकृतपणे ताब्यात घेतले असून, क्लिपची तांत्रिक पडताळणी आणि आवाजांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. Manoj Jarange

जीविताला धोका असल्याने स्रोत सांगण्यास नकार; रामदास कदमांच्या क्लिपच्याही चौकशीची मागणी

एसआयटीचे अधिकारी भेटून गेल्यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, तपास यंत्रणेच्या मागणीनुसार आपण संबंधित ऑडिओ क्लिप सुपूर्द केली आहे; मात्र ही क्लिप कोणी दिली, याचा स्रोत सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. क्लिपमधील संबंधित व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारल्याशिवाय स्रोताचे नाव सांगता येणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. यासोबतच शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्यापेक्षा दोन तास आधी तीच क्लिप ऐकवली होती, असा दावा करत रामदास कदम यांच्याकडूनही क्लिप ताब्यात घेऊन त्यांना ती कोणी दिली, याचा तपास करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.



मराठा आंदोलन मोडण्यासाठी आर्थिक आमिष व बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक करत मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता, ज्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. याप्रकरणी बोलताना जरांगे यांनी आरोप केला की, क्लिपमध्ये काही आमदारांची नावे असून मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पैशांचे आमिष दाखवून आंदोलनाच्या विरोधात उभे करणे, प्रतिमोर्चे काढणे आणि आपली बदनामी करणे असे नियोजन करण्यात आले होते. आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता चटणी-भाकर खाऊन समाधानी राहू, असे स्पष्ट करत केवळ ऑडिओ क्लिपपुरता तपास मर्यादित न ठेवता कार्यकर्त्यांना कोणी फोडले, कोणी आर्थिक मदत केली आणि कोणावर दबाव आणला, या सर्व बाबींचा सखोल तपास एसआयटीने करावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

500 Crore Allegation: SIT Team Visits Manoj Jarange’s Home, Seizes Audio Clip and Evidence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात