विशेष प्रतिनिधी
बारामती : राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांची तयारी करावी. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून मे-जून २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. Sunetra Pawar
बारामती येथील सहयोग निवासस्थानी उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करावी. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश पवार यांनी दिले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
वीजविषयक कामांचा घेतला आढावा….
बारामती तालुक्यात महावितरणअंतर्गत पूर्ण झालेली, प्रगतीपथावर असलेली आणि प्रस्तावित असलेल्या वीजविषयक विकासकामांचाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला. सर्व कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वीजविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्पर राहावे, अशा सूचनाही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App