दहीहंडीचा जल्लोष रद्द, ५१ लाखांचा मदतीचा हात; राणा दाम्पत्याचा मोठा निर्णय!

विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यंदाची भव्य दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राणा दाम्पत्याच्या वतीने दरवर्षी अमरावतीत मोठ्या उत्साहात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा उत्सवाचा खर्च करण्याऐवजी तो निधी समाजोपयोगी कामासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.



दहीहंडी स्पर्धेसाठी करण्यात येणारा ५१ लाख रुपयांचा खर्च मृत नवजात बाळांच्या नातेवाईकांसह इतर गरजू कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून वितरित करण्यात आला. या मदतीमुळे संकटाच्या काळात संबंधित कुटुंबांना आधार मिळाला आहे.

राणा दाम्पत्याने उत्सवाचा गाजावाजा न करता दुःखाच्या प्रसंगी पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दुर्घटनेत नवजात बाळांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dahi Handi celebrations cancelled, ₹51 lakh aid pledged; major decision by the Rana couple!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात