चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित


येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.BJP’s national executive has decided to nominate Chitra Wagh for the Legislative Council


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चिात झाले आहे.यामुळे आता चित्रा वाघ या आमदार म्हणून विधानसभेत सरकारला धारेवर धरताना दिसू शकतील.



राज्यात महिलांच्या विरोधात कोठेही अत्याचार झाल्यास वाघ या लगेचच धावून जातात. राज्यातील बड्या नेत्यांना डावलून चित्र वाघ यांना नुकतेच राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत यावर अंतिम शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

BJP’s national executive has decided to nominate Chitra Wagh for the Legislative Council

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात