अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ; २९ नोव्हेंबर पर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी


देशमुखांचे वकिल अनिकेत निकम यांनी अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली होती.Anil Deshmukh’s difficulty increases; Judicial custody till November 29


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल देशमुख यांची ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. दरम्यान, त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु आज १५ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.म्हणजे आता २९ नोव्हेंबर पर्यंत अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.देशमुखांचे वकिल अनिकेत निकम यांनी अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली होती.तसेच “अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहे. त्या़ंचे वय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी” असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुखांना खासगी वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे.परंतु न्यायालयाने देशमुखांना घरचे जेवण देण्यास मंजुरी दिलेली नाही.

Anil Deshmukh’s difficulty increases; Judicial custody till November 29

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती