अनिल देशमुखांच्या वकिलाचा आणि सीबीआय इन्स्पेक्टर अभिषेक तिवारीचा जामीन अर्ज दिल्ली कोर्टाने फेटाळला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून शंभर कोटींची खंडणी वसूली प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी या दोघांचे जामीन अर्ज दिल्ली कोर्टाने आज फेटाळून लावले.Anil Deshmukh’s lawyer and CBI inspector Abhishek Tiwari’s bail plea rejected by Delhi court

आनंद डागा आणि अभिषेक तिवारी यांना लाचखोरी प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्या संदर्भातील सीबीआयचा अहवाल अभिषेक तिवारी याने लाच घेऊन लिक केला होता.



अनिल देशमुख यांनी वकील आनंद डागा यांच्यामार्फत त्याला लाच दिली असा त्या दोघांवर आरोप आहे. दिल्ली कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीतच राहून सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे नाहीत असे या अहवालात कथित स्वरूपात लिहिण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सीबीआयने सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना अटक केल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. ते जरी सध्या फरार असले तरी त्यांचा वकील आता सीबीआयच्या कोठडीत असल्याने तो नेमके काय बोलतो यामुळे देखील अनिल देशमुख अडचणीत आले आहेत.

Anil Deshmukh’s lawyer and CBI inspector Abhishek Tiwari’s bail plea rejected by Delhi court

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात