रामाच्या अयोध्येत भव्य दीपोत्सवाची जय्यत तयारी; आणखी एक विक्रम ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता


वृत्तसंस्था

अयोध्या : प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामनगरी अयोध्येत भव्य दीपोत्सवाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. दीपोत्सवात ७ लाख ५० हजार दीप प्रज्वलित केले जाणार आहेत. हा एक नवा विक्रम असेल.Preparations for grand Dipotsava in Ayodhya; Prime Minister Narendra Modi is likely to participate

अयोध्येत पाचवा दीपोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. राम की पैड़ी येथे जीर्णोद्धार आणि अयोध्येशी संबंधित विकास कामे वेगाने सुरु आहेत. ही नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येथेच बाहुबली आणि लगान चित्रपटाचे सेट तयार करणारे आर्ट डायरेक्टर चंद्रकात देसाई हे दीपोत्सवाचा सेट तयार करणार असल्याची चर्चा आहे.



पर्यटन व संस्कृति विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी दीपोत्सवाची तयारी सुरु केली आहे.अयोध्या जंक्शनचा पुनर्विकासाशी संबंधित काम लवकर मार्गी लावले जाणार आहे. श्रीराम एअरपोर्टचे पहिल्या फेजच्या कामाचे कंत्राट दिले गेले आहे. खासदार लल्लू सिंह यांनी मंगळवारी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा केली. तसेच काम लवकर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

दीपोत्सवावेळी रामायण क्रूजचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दीपोत्सवावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी समारंभ आयोजित केले जाणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदाचा दीपोत्सव पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबतची अधिकृत माहिती नाही, असे विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विशाल सिंह यांनी सांगितले आहे.

Preparations for grand Dipotsava in Ayodhya; Prime Minister Narendra Modi is likely to participate

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!