विशेष प्रतिनिधी
मुबंई : अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असणारा सूर्यवंशी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जवळपास दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने वीकेण्डला तब्बल 77 कोटींची कमाई केली आहे. रोहित शेट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
Akshay Kumar’s Suryavanshi Cinema is the highest grossing film after covid period
मागील बऱ्याच दिवसांपासून सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत होते. दर दिवाळीमध्ये कोणत्या तरी एका खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित व्हायचा. पण ह्यावेळी बाजी खिलाडी अक्षय कुमारने मारली आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी प्रदर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी देत बॉलीवूड इंडस्ट्रीला मिळालेल्या दिवाळी गिफ्टबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
SURYAWANSHI: या देशात पंतप्रधानांवर प्रेम करणे देखील गुन्हाच ! अक्षय कुमारला देशप्रेम पडतयं महागात; #BoycottSuryawanshi सोशल मीडियावर ट्रेंड
या चित्रपटाआधी बेलबॉटम, रुही, मुंबई जागा आणि थलाइवी हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या सर्व चित्रपटांमध्ये सूर्यवंशी ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कमाई करण्याचा विक्रम बनवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App