भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीन सातत्याने व्यूहात्मक खेळी करत दबाव वाढवित आहे, असे अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अमेरिकेशी संबंध दृढ करण्यापासूनही भारताला रोखण्याचा चीनचा प्रयत्न असून यामध्ये त्यांना अपयश आले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.China plays dirty politics with India says USA

चीन अमेरिकेसमोर नवे आव्हान म्हणून उभे ठाकत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ होत असल्याचेही चीनला रुचत नसल्याने ते भारतावर विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे.



‘‘भारताचा विकास रोखण्यासाठी चीनकडून सीमेवरील तणाव कायम ठेवला जात आहे. भारत आणि चीनच्या संबंधांत दखल न देण्याचा इशाराही चीनकडून अमेरिकेला देण्यात आला आहे,’’ असे या अहवालात म्हटले आहे.

भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये असलेल्या तणावाबाबत पेंटॅगॉनकडून अमेरिकी संसदेला नियमित कालावधीने अहवाल दिला जातो. चीन आपल्या शेजाऱ्यांविरोधात आक्रमक धोरण राबवत आहे, असे अमेरिकेचे मत आहे.

China plays dirty politics with India says USA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!