सीरियामध्ये अमेरिकेचा पुन्हा हवाई हल्ला, अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद ड्रोन हल्ल्यात ठार


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा सिरियातील दहशतवादी अड्ड्यावर काल पुन्हा हवाई हल्ला केला. त्यात अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद हा ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. US airstrikes in Syria kill al-Qaeda’s most wanted Abdul Hamid drone strike

सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी यांनी शुक्रवारी या हल्ल्याची पुष्टी केली.  उत्तर पश्चिमी सीरियामध्ये अमेरिकन सैन्यानं केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अब्दुल हामिद अल-मातर मारला गेला आहे. रिग्सबी यांनी सांगितलं की, हवाई हल्ल्यासाठी एमक्यू-९ विमानाचा वापर केला. हल्ल्यात कोणताही नागरिक दगावला नाही.

रिग्सबी म्हणाले, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसाठी अल कायदाकडून नेहमीच धोकदायक आहे.दहशतवादी संघटना सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करून दहशतवादी कारवायांचा कट आखते.अल कायदाच्या योजनांवर पाणी

अल-कायदाच्या म्होरक्याची हत्या झाल्याने दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्यांच्या काटावर पाणी फिरले आहे. आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचे छळ थांबतील, अशी आशा आहे, असं रिग्सबी यांनी सांगितलं. अमेरिकी भूमीला नुकसान पोचविण्याचे षडयंत्र हाणून पाडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सप्टेंबरमध्ये सुद्धा हल्ला

याआधीही २० सप्टेंबर रोजी अमेरिकेनं सीरियाच्या इदलिब शहरामध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात अलकायदा नेता सलीम अबू-अहमद मारला गेला होता. सलीम हा अल कायदामध्ये प्लान बनवणे आणि फंडिंगचा वापर करण्याचं काम करायचा. त्याआधी  दक्षिण सीरियात अमेरिकेच्या चौकीवर केलेल्या हल्ल्याचा हा बदला होता.

US airstrikes in Syria kill al-Qaeda’s most wanted Abdul Hamid drone strike

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती