हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पंतप्रधानांचा राजीनामा, माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप


विशेष प्रतिनिधी

सायप्रस : हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने उत्तर सायप्रस देशाच्या पंतप्रधानाना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र हे माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप पंतप्रधान इरसान सानेर यांनी केला आहे.PM resigns after video of him masturbating comes to light

सायप्रसमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत ५४ वर्षीय इरसान सानेर यांचा पक्षच त्यांच्या विरोधात गेला आहे.कारण त्यांच्या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र, सानेर यांनी निवडणुकीनंतरही राजकारण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अशा प्रकारचा अडचणीत टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द यामुळे संकटात सापडली आहे.या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या अंगावरचे कपडे क्रमाक्रमाने काढत आहे, ज्याला स्ट्रीप टीझ करणे म्हणतात. पंतप्रधान सानेर हे हस्तमैथुन करताना दिसत आहेत. मात्र सानेर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. सानेर म्हणाले की हा व्हिडिओ माझा नाही.

कोणीतरी माझ्या देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय मार्गाने आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही म्हटल्यावर ते अशा पद्धतीने हल्ले माझ्यावर करत आहेत. हे माफियांचं षडयंत्र असून हा हल्ला केवळ आपल्यावर नसून आपल्या कुटुंबावर, पक्षावर आणि राजकीय संस्थावर आहे. आपण कायदेशीर सल्लागारांबरोबर चर्चा करत आहोत.

PM resigns after video of him masturbating comes to light

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण