जर एखाद्या ब्रँडला हिंदू पैसा हवा असेल तर त्यांनी हिंदू भावनांचा आदर केला पाहिजे, असे लेखिका शेफाली वैद्य म्हणतात
एकच ट्विट, एक महत्त्वाचा सोशल मीडिया ट्रेंड संपूर्ण वाणिज्य उद्योगाला हादरवून टाकू शकतो. तुमचा यावर विश्वास नाही का? ठीक आहे, #NoBindiNoBusiness ट्रेंड ज्याने कपड्यांचा ब्रँड फॅबइंडियाला त्याच्या दिवाळी उत्पादनांचे उर्दू नाव ‘जश्न-ए-रिवाज’ बदलून ‘झिलमिल सी दिवाळी’ करायला भाग पाडले आहे. NO BINDI NO BUSINESS: “No Bindi No Business”! Dhumakul on social media… Shefali Vaidyan knocked – many raised their voices … Read more
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : काही उत्पादकांनी दिवाळीनिमित्त प्रसारित केलेल्या जाहिरातींमध्ये बहुसंख्य हिंदूंना काहीतरी खटकलं. ते नेमकं काय याचा ऊहापोह करणाऱ्या शेकडो पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांची दिवाळी निमित्त आलेली पोस्टर पाहून प्रसिद्ध लेखिका ब्लॉगर शेफाली वैद्य म्हणतात, मराठी दीपावली अशी असते, रंगीत, आनंदी, हसरी, सालंकृत, शुभ! सोनाली कुलकर्णी अशी मयताला आल्यासारखी काय दिसते?
#This is what #Deepawali collection should be like! pic.twitter.com/is7l9bqpYv — Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) October 22, 2021
#This is what #Deepawali collection should be like! pic.twitter.com/is7l9bqpYv
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) October 22, 2021
मी स्पष्टपणे ब्रॅंडसना सांगतेय की दिवाळीच्या प्रॉडक्टसची जाहिरात करताना लक्षात ठेवा की दिवाळी हा एक #हिंदू सण आहे. हिंदूंचे पैसे पाहिजेत ना, मग हिंदू परंपरांचा, हिंदू रितीरिवाजांचा सन्मान करायला शिका. आमच्या सणामध्ये भुंड्या कपाळाच्या बायका सुतकी चेहेऱ्याने वावरत नाहीत, मग जाहिरातीत तरी असं का असावं?
हॅशटॅग नो बिंदी नो बिजनेस व्हायरल झाल्यामुळे शेफाली वैद्य यांच्यावर विविध स्तरावून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्यावर त्या म्हणतात, “ओ फेमिनिष्ठ ताई, तुम्ही कुंकू लावा नाहीतर तुमच्या नेहमीच्या कळकट्ट पारोश्या घाणेरड्या अवतारात झिंज्या सोडून नाचा, तो तुमचा प्रश्न आहे.
त्यावर त्या म्हणतात मी काही फतवा काढलेला नाहीये की सर्व बायकांनी बिंदी लावलीच पाहिजे. मी स्पष्टपणे ब्रॅंडसना सांगतेय की दिवाळीच्या प्रॉडक्टसची जाहिरात करताना लक्षात ठेवा की दिवाळी हा एक हिंदू सण आहे. हिंदूंचे पैसे पाहिजेत ना, मग हिंदू परंपरांचा, हिंदू रितीरिवाजांचा सन्मान करायला शिका. आमच्या सणामध्ये भुंड्या कपाळाच्या बायका सुतकी चेहेऱ्याने वावरत नाहीत, मग जाहिरातीत तरी असं का असावं? NoBindiNoBusiness हा हॅशटॅग सुरु करताना स्पष्ट म्हटलं होतं की हा माझ्यापुरता निर्णय आहे. माझे कष्टाचे पैसे आहेत, ते कशावर खर्च करायचे ते मी ठरवणार. हॅशटॅग ट्रेंड झाला तो इतर खूप लोकांना माझ्यासारखंच वाटत होतं म्हणून. मी फक्त त्या खदखदीला वाट करून दिली.”
शेफाली वैद्य यांनी आज पुन्हा एकदा बिंदीशिवाय मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला दाखवल्याबद्दल पीएनजी ज्वेलर्सचा विनोद केला. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, वामन हरी पेठे ज्वेलर्स सारख्या ब्रॅण्ड्सची खऱ्या हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन आणि दिवाळीचा खरा अर्थ चित्रित केल्याबद्दल तिने कौतुक केले. ” #दीपावली कलेक्शन असेच असावे!”, तिने पेडणेकर ज्वेलर्सची जाहिरात शेअर करत ट्विट केले.
शेफाली वैद्य यांनी आज पुन्हा एकदा बिंदीशिवाय मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला दाखवल्याबद्दल पीएनजी ज्वेलर्सला सुनावले. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर वामन हरी पेठे हिंदूचा सन्मान करतात.
त्या पुढे म्हणतात, “आतापर्यंत हा हॅशटॅग फक्त ट्विटर वर जवळजवळ सात लाख लोकांनी बघितलाय. त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी हे खरोखर मनावर घेतलं तर ब्रँडस ना बदलावंच लागेल, कारण त्यांना हे स्पष्ट दिसतंय. माझ्यावर जितकी वैयक्तिक चिखलफेक होते आहे तितकाच हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय आणि तेच तर मला अभिप्रेत आहे. एक पैसाही प्रमोशन वर न खर्च करता माझा विचार आज फेसबुक आणि ट्विटर मिळून दहा लाख लोकांपर्यंत पोचलाय, तुम्ही बसा माझ्या नावाने बोटं मोडत आणि आक्रस्ताळा थयथयाट करत!”
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10161550129297796&id=582727795&sfnsn=wiwspmo
#NoBindiNoBusiness हा हॅशटॅग सुरु करताना स्पष्ट म्हटलं होतं की हा माझ्यापुरता निर्णय आहे. माझे कष्टाचे पैसे आहेत, ते कशावर खर्च करायचे ते मी ठरवणार. हॅशटॅग ट्रेंड झाला तो इतर खूप लोकांना माझ्यासारखंच वाटत होतं म्हणून. मी फक्त त्या खदखदीला वाट करून दिली. आतापर्यंत हा हॅशटॅग फक्त ट्विटर वर जवळजवळ सात लाख लोकांनी बघितलाय. त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी हे खरोखर मनावर घेतलं तर ब्रँडस ना झक्कत बदलावंच लागेल, आणि तिथेच तर वोक लिबटर्ड लोकांची वाट लागलेली आहे. कारण त्यांना हे स्पष्ट दिसतंय.
शेफाली वैद्य यांनी अतिशय स्पष्ट आणि कमी शब्दांत लिहिलं होते की, ज्या ब्रँड मधील स्त्री मॉडेल टिकली लावलेली नसेल त्याच्याकडून मी स्वतः काही खरेदी करणार नाही. कुणाला जबरदस्ती नाही की प्रत्येकाने टिकली लावलीच पाहिजे. फक्त जो ब्रँड आहे त्यातील स्त्री मॉडेलने ती लावावी हा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या या वैयक्तिक निर्णयाला नेटकऱ्यांनी उचलून धरले आहे. बरेच जण समर्थनाच्या भूमिकेत तर इतर त्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more