पंजाबमधील शेतकरी संघटनेने या चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, अक्षय कुमार हा सत्ताधारी पक्ष बीजेपीच्या खूप जवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला हा विरोध होत आहे. SURYAWANSHI: It is also a crime to love the Prime Minister in this country! Akshay Kumar’s patriotism is expensive; #BoycottSuryawanshi Trends on social media
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : या देशात पंतप्रधानांना आदर्श मानून त्यांना फॉलो करणे देखील गुन्हा आहे .अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सर्वत्र धमाल करताना दिसत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.मात्र पंजाब मध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे.
चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे. परंतु पंजाब हे असे एक राज्य आहे, जिथे या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करायला लागत आहे. पंजाबमध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पंजाब शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉट सूर्यवंशी’ हा ट्रेंड चालू आहे. शेतकरी संघटनेने हा चित्रपट कितीतरी चित्रपटगृहात चालू करून दिला नाही. (Akshay Kumar’s sooryavanshi in panjab Kisan morcha did not allow the film to run in many theatres)
माध्यमातील वृत्तानुसार, बुढलाधामधील दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांना अशी भीती आहे की, आंदोलन करणारे त्यांच्या संपत्तीचे नुकसान तर नाही ना करणार. त्यांना अशी भीती वाटत आहे की, जर त्यांनी हा चित्रपट चालू केला तर त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागेल. हाती आलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी या चित्रपटाला होणारा विरोध वाढत आहे.
पंजाबमधील शेतकरी संघटनेने या चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, अक्षय कुमार हा सत्ताधारी पक्ष बीजेपीच्या खूप जवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला हा विरोध होत आहे आणि असे म्हटले जात आहे की, हा विरोध अजूनच वाढणार आहे. शेतकरी संघटनेने एकत्र सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App