शिंदे – फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी योजनेतून तब्बल 1.5 कोटी लोकांना विविध लाभ!!

वृत्तसंस्था

मुंबई : शासन आपल्या दारी योजनेतून शिंदे फडणवीस सरकारने तब्बल 1.5 कोटी लोकांना वेगवेगळे लाभ दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. परभणीत शासन आपल्या दारी योजनेचा समारंभ झाला, त्या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातली मोठी यादीच वाचून दाखवली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 22000 ट्रॅक्टर्स, 22500 रोटोव्हेटर्स तसेच तब्बल 4 कोटी लोकांना प्रत्यक्ष पैशाच्या रूपात 1351 कोटी रुपयांचे लाभ देण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.Shinde-Fadnavis government government has given various benefits to as many as 1.5 crore people through its Dari Yojana!!

परभणी जिल्ह्यात 8.50 लाख लाभार्थींना एकूण 1500 कोटींचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे आणि स्वातंत्र्यसैनिक पत्नी गयाबाई रेंगे यांना सन्मानित करण्यात आले.



सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी हा अत्यंत लोकाभिमुख कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्यामाध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौरा यशस्वी करून जपानमधील जायका कंपनीकडून राज्यातील ३-४ प्रकल्पांसाठी सहकार्य मिळवण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन केले. तसेच परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकताच त्यांनी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना ज्यापद्धतीने प्रोत्साहित केले ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहाय्यानेच मराठवाडा वॉटर ग्रीड किंवा पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणे असे प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
यावेळी व्यक्त केले.

ऑनलाइन वरून लाईनवर

विरोधकांनी त्यांच्यावर किंवा आमच्यावर टीका करण्याशिवाय एकही विधायक सूचना आजवर केलेली नाही. त्याना ऑनलाइन वरून लाईनवर आणण्याचे काम आम्ही केले आहे. यांचा भोंगा कायम वाईट बोलण्यासाठी वाजतो तो कधीही काही चांगले सांगत नाही. राज्यात होत असलेले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते फक्त टीका करत सुटले आहेत असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत असे मत यावेळी व्यक्त केले.

 महिलांना शक्तीगट

राज्यातील महिलांच्या बचत गटांना बळ देऊन त्यांना शक्तीगट बनवण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे जाहीर केले. परभणी शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजनेतून 400 कोटींची गरज आहे. रस्ते सुधारण्यासाठी 70 कोटी 21 लाख रुपयांचा जो निधी मंजूर झाला आहे त्यातून कामे सुरू होतील. शेलू तालुक्यातील एमआयडिसीसाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करूनच जमीन अधिग्रहण केले जाईल आणि नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना यासाठी नक्की निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.

Shinde-Fadnavis government government has given various benefits to as many as 1.5 crore people through its Dari Yojana!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात