महुआ मोईत्रांची चंद्रावरील पॉइंटला शिवशक्ती नाव देण्यावरून टीका, म्हणाल्या- अदानी चंद्रावर अर्थ फेसिंग फ्लॅट बांधतील


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बंगळुरू येथील इस्रो केंद्रात जाऊन सर्व शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी चांद्रयान 3 च्या लँडिंग साइटला शिवशक्ती असे नाव दिले. मात्र, हे नाव विरोधकांना फारसे रुचले नाही.Mahua Moitra criticized for naming a point on the moon as Shiva Shakti, said- Adani will build Earth facing flats on the moon

यावर काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी आक्षेप घेत म्हटले – आपण नाव देणारे कोण आहोत, आपण चंद्राचे मालक नाही.



दुसरीकडे, TMC खासदार महुआ मोईत्रांनी रविवारी ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. अदानींचे नाव घेऊन मोईत्रांनी चांद्र मोहिमेवरून केंद्र सरकारला घेरले. मोईत्रा म्हणाल्या- अदानी आता चंद्रावर अर्थ फेसिंग फ्लॅट बांधणार आहेत.

मुस्लिम नाही, फक्त शुद्ध शाकाहारी लोक चंद्रावर राहू शकतील

महुआंनी पुढे लिहिले की, अदानींना फ्लॅट बांधण्यासाठी टेंडर घेण्याची गरज नाही. चंद्रावर मुस्लिमांना परवानगी दिली जाणार नाही. फक्त शुद्ध शाकाहारी लोकांसाठी फ्लॅट असतील.

यापूर्वी, महुआंनी शनिवारी लिहिले होते की इस्रोचे लँडर पहिल्यांदाच चंद्रावर गेलेले नाही. नरेंद्र मोदी चंद्रावर गेलेले नाहीत, चांद्रयानाचे संशोधन भाजपच्या आयटी सेलने केलेले नाही, याची भाजपला आठवण करून दिली पाहिजे. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने इस्रोला प्रचाराचे साधन बनवले आहे.

लँडिंग पॉइंटला नाव देणे हास्यास्पद

दुसरीकडे काँग्रेस नेते राशीद अल्वींनीही लँडिंग पॉइंटचे नाव ‘शिवशक्ती’ असण्यावर आक्षेप घेतला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, आपण चंद्राचे मालक नाही. आपण चंद्रावर उतरलो ही चांगली गोष्ट आहे, परंतु नामकरण हास्यास्पद आहे. यामुळे इतर देश आपल्यावर हसतील. भाजप सत्तेत आल्यापासून नावे बदलण्याची त्यांची सवय झाली आहे.

काँग्रेसने जवाहर पॉइंट नावाचा बचाव केला

राशीद अल्वी यांनी मात्र चांद्रयान 1 लँडरला जवाहर पॉइंट असे नाव देण्याचे समर्थन केले. ते म्हणाले- तुम्ही जवाहरलाल नेहरूंची तुलना करू शकत नाही. आज इस्रो जे काही आहे ते नेहरूंमुळे आहे. इस्रोची स्थापना 1962 मध्ये नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी केली होती. नेहरू त्याचे संस्थापक होते असे तुम्ही म्हणू शकता. ही पूर्णपणे वेगळी बाब होती पण मोदीजी त्यावर राजकारण करत आहेत.

Mahua Moitra criticized for naming a point on the moon as Shiva Shakti, said- Adani will build Earth facing flats on the moon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात