”KCRच्या गाडीचं स्टेअरिंग ओवेसींच्या हाती, तर काँग्रेस हा ‘4जी’ पक्ष” – तेलंगणात अमित शाहांनी साधला निशाणा!


BRS म्हणजे 2G पक्ष आणि एमआयएम 3G पार्टी असल्याचंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

तेलंगणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील खम्मम येथे ‘रायथू गोसा-भाजपा भरोसा’ रॅलीला संबोधित करताना सांगितले की, यावेळी भाजपा येथे सत्तेवर येईल. ते म्हणाले की, काँग्रेस हा 4G पक्ष आहे, म्हणजे चार पिढ्यांचा पक्ष (जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी), BRS म्हणजे 2G पक्ष, म्हणजे दोन पिढ्यांचा पक्ष (KCR आणि नंतर KTR) आणि ओवेसींचा पक्ष आहे, 3G पार्टी, ती 3 पिढ्यांपासून चालू आहे. The steering of KCRs car is in the hands of Owaisi while the Congress is the 4G party Amit Shah hit the mark in Telangana

यावेळी राज्यात ना टूजी, ना थ्रीजी, ना फोरजी येणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी येथे भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार, या वेळी कमळ फुलण्याची वेळ आहे. केसीआर यांनी ओवेसींसोबत बसून तेलंगण मुक्ती संग्रामातील लोकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचे काम केले आहे. आगामी काळात केसीआर हे मुख्यमंत्री राहणार नाहीत. यावेळी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार आहे. असेही अमित शाह यांनी सांगितले.

भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) खिल्ली उडवत गृहमंत्री म्हणाले, “आम्हाला माहित आहे की तुम्हाला (केसीआर) केटीआरला राज्याचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, परंतु यावेळी केसीआर किंवा केटीआर मुख्यमंत्री होणार नाहीत. यावेळी इथे भाजपा मुख्यमंत्री बनणार आहे.” तसेच,  लोकांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “केसीआर यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह एक कार आहे. ती गाडी भद्राचलमपर्यंत जाते, पण राम मंदिरापर्यंत जात नाही कारण त्या गाडीचे स्टीयरिंग ओवेसींच्या हातात आहे.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर हल्लाबोल करत अमित शहा म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की केसीआर आणि भाजप निवडणुकीनंतर एकत्र येतील, खरगे, तुम्ही या वयात खोटं का बोलता? असदुद्दीन ओवेसी केसीआरसोबत बसले आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मी हे सांगण्यासाठी आलो आहे. काहीही झाले तरी भाजप केसीआर आणि ओवेसी यांच्यासोबत कधीच जाणार नाही. आम्ही मजलिस लोकांसोबत एकाच व्यासपीठावर बसू शकत नाही, सत्तेचा मुद्दाच येत नाही .”

The steering of KCRs car is in the hands of Owaisi while the Congress is the 4G party Amit Shah hit the mark in Telangana

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात