केंद्र सरकारने उकडलेल्या तांदळावर लावले 20 टक्के निर्यात शुल्क , बिगर बासमती तांदळावर आधीच बंदी


जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती आणखी वाढतील.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर भारत सरकारने 20 टक्के शुल्क लावले आहे. सरकारच्या या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल म्हणजेच आतापासूनच त्याच्या निर्यातीवर कर आकारणी सुरू होईल. जगातील सर्वात मोठ्या तांदूळ निर्यातदाराच्या या निर्णयानंतर निर्यात कमी होऊन जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती आणखी वाढतील. Central government imposes 20 percent export duty on parboiled rice non basmati rice already banned

यावर्षी सरकारने तांदळाच्या अनेक जातींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी भारताने 74 लाख टन उकडलेला तांदूळ निर्यात केला होता. मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, तांदळाच्या इतर वाणांवर बंदी घातल्याने उकडलेल्या तांदळाच्या खरेदीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

या निर्यात शुल्कानंतर उकडलेल्या तांदळाची किंमत पाकिस्तान आणि थायलंडच्या किंमतीइतकी असेल. आता विदेशी व्यापाऱ्यांकडे आयातीचा कोणताही स्वस्त पर्याय राहणार नाही. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४०% पेक्षा जास्त आहे.

Central government imposes 20 percent export duty on parboiled rice non basmati rice already banned

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात