ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेले; पवारांची मुश्रीफांवर नाव न घेता टीका; अजित पवारांचेही नाव टाळले!!


प्रतिनिधी

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी प्रचंड उत्सुकता असलेल्या कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जरूर टीका केली, पण ती नाव न घेता!! त्याच बरोबर एकाच दिवशी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलेल्या पवारांनी अजित पवारांचे नाव घेणेही कोल्हापूरच्या सभेत टाळले. Went there scared of ED action :  pawar

शरद पवारांची कोल्हापुरात मोठी स्वाभिमान सभा झाली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. या सभेत पवार अजित पवार आणि भाजप यांच्यावर काय शरसंधान साधतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण पवारांनी आपल्या टीकेचा रोख फक्त भाजपवर ठेवला. हसन मुश्रीफांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अजित पवारांचे तर नाव देखील त्यांनी घेतले नाही.

ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या कारवायांना घाबरून कोल्हापुरातले माझे जुने सहकारी भाजपमध्ये गेले. वास्तविक त्यांच्या घरातल्या महिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आमच्या घरावर छापे घालण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला, असे उद्गार काढले होते कोल्हापूरचा इतिहास हा शौर्याचा आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. पण माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी मात्र तसेच शौर्य न दाखवता भाजपकडे जाणे पसंत केले, असे शरसंधान शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता साधले. अजित पवारांचे तर त्यांनी नाव देखील घेतले नाही.



केंद्रातल्या मोदी सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागल्याबद्दल पवारांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले.

पण पवार जाहीर भाषणात अजित पवारांवर “सॉफ्ट” राहिले. त्यामुळे महाराष्ट्रात तो चर्चेचा विषय ठरला.

आज दिवसभरात शरद पवारांनी बारामतीत अजित पवार “आपले”च नेते असल्याचे म्हटले, पण साताऱ्यात जाऊन त्यांनी घुमजाव केले. आपण असे बोललोच नसल्याचे कानावर हात त्यांनी ठेवले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार बहिण भाऊ आहेत. त्यांच्या वक्तव्यांचे राजकीय अर्थ काढू नका, असे त्यांनी माध्यमांना सुनावले. या पार्श्वभूमीवर पवार कोल्हापूरच्या सभेत अजित पवारांवर जोरदार शरसंधान साधतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली.

Went there scared of ED action : pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात